
घरातून दागिने चोरताना एकाला पकडले
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I चाकण येथील मेदनकरवाडी परिसरातील एका घरातून 1.61 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेत असताना एकाला अटक करण्यात आले आहे.
याबाबत संजय बिंदे, वय 55 वर्ष, रा. शिक्षक कॉलनी, मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेश लोहार, वय 27 वर्षे, रा. वाठार, ता. कोरेगाव जिल्हा सातारा या आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात भा.द.वि कलम 393 अन्वये चाकण पोलीस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीच्या राहत्या घरात 28 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरोपी याने घुसून एकूण 1.60 लाख रुपये किमतीचे 4.30 ग्राम वजनाचे वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने, 1,000 रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट व सातशे रुपये रोख असे एकूण 1,61,700 रुपये किमतीचा माल चोरला असून हा माल लंपास करतानाच या चोरट्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
