
मुळा नदीच्या पात्रात मयत अर्भक सापडले
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पुण्यातील संगमवाडी जवळील मुळा नदीच्या पात्रात अंदाजे सहा महिन्याचे पुरुष जातीचे मयत अर्भक सापडले आहे. 10 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे अर्भक त्या ठिकाणी दिसून आले. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई मनोज गंगाधर दिवे यांनी याप्रकरणी तक्रार दिली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बोट क्लबच्या विरुद्ध बाजूस असणाऱ्या मुळा नदीच्या पात्रात 10 डिसेंबर रोजी पुरुष जातीचे मयत अर्भक आढळले आहे. अज्ञात पालकांनी आपले कुकर्म लपविण्याच्या उद्देशाने किंवा अर्भकाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्याला नदीपात्रात टाकून दिले आहे. खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
