PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

दिघी येथे कोयत्याने एकावर हल्ला

पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) संध्याकाळी दिघी येथील सावंत नगर येथे घडला आहे.

श्रेयस सुनिल गाढवे (वय 21 रा. दिघी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अर्जुन वाघमोडे, ओमकार गाढेकर, राम देवकाते, अनिकेत लोहिरे (रा. दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एक महिन्यापुर्वी अनिकेत याच्या कानाखाली मारली होती. याचाच राग मनात धरून फिर्यादी व फिर्यादीचा मित्र ओमकार अमित वाड हे घरी जात असताना आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला अडवले. आरोपींनी (Dighi) दोघांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्कक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, आरोपींनी हातातील कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर तसेच कमरेच्या दोन्ही बाजूला मारून गंभीर जखमी केले. तसेच, फिर्यादी यांचा मित्र ओमकार यालाही कोयता व सत्तूरने मारून जखमी केले.

त्यांनी आसपासच्या लोकांना मदतीले बोलावले असता आरोपींनी हातातील कोयता उगारून नागरिकांना जिवे मारण्याची धमकी देत दहशत पसरवली. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.