
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I १४ डिसेंबर २०२२ I चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्यांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
अल्ताफनबी शेख (वय 27) याला अटक केली असून नवी इस्माईल शेख (वय 50) व पाच महिलां आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मे 2022 पासून फिर्यादीचा छळ करत होते. चारित्र्यावर संशय घेत वारंवार शिवीगाळ करत होते.तसेच हाताने मारहाण करुन शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक छळ करत क्रुर वागणूक दिल्याची तक्रार विवाहितेने दिली असून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
