PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

हिंजवडी येथे एकास कारमधून आलेल्यांनी लुटले

पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I कारमधून येऊन चार जणांनी एकाला मारहाण करत लुटल्याची घटना हिंजवडी फेज तीनमध्ये घडली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.22) रात्री माईन ट्री कंपनी समोर घडला आहे.

याप्रकऱणी अभिषेक पारस पुंग्लिया (वय 40 रा.वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चारचाकी (एमएच 12 आर.वाय.3804) मधील अज्ञात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारने घरी जात असताना आरोपी त्यांची चारचाकी पाठीमागून घेऊन आले व त्यांनी फिर्यादीला माईन ट्री कंपनीच्या समोर अडवले. यावेळी त्यांनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादीच्या पेटीएमवरून जबरदस्तीने स्कॅनरवर स्कॅन करून फिर्यादीच्या खात्यातील 2 हजार रुपये काढून घेतले. हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस (Hinjawadi) आरोपींचा शोध घेत आहेत.