
पुण्यात २३ वर्षीय युवतीवर अत्याचार
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I मित्राच्या बहिणीच्या लग्नात एका अनोळखी तरुणासोबत झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटत राहिले. त्यानंतर आरोपीने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शरीर संबंध केले आहेत. नंतर मात्र लग्न करण्यासाठी नकार दिला. त्यानंतर या तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणी ही 23 वर्षाची आहे. पुण्यातील पर्वती परिसरात ती राहण्यासाठी आहे. 2019 मध्ये फिर्यादी एका मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी गेली होती. त्या ठिकाणी तिची आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि दोघे एकमेकाला सातत्याने भेटत गेले.
आरोपींनी फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवले आणि वारंवार जबरदस्तीने त्यांच्यासोबत शरीरसंबंध केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. काही कालावधीनंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला.. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दिली. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.