PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक

पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । कासारसाई येथे प्लॉट खरेदीसाठी पैसे घेऊन गुंतवणूकदारांची 76.51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत डॉ. आनंद झिंगाडे (वय 42 वर्षे, रा. धायरी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आकाशीय प्रोजेक्टचे मालक के. शब्बीर बाबु या आरोपी विरोधात भादवि कलम 420, 406 सह एमपीआयडी ऍक्ट 1999 कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी आणि साक्षीदार यांनी के. शब्बीर बाबू यांच्याकडून हिंजवडी येथील कासारसाई येथे प्लॉट बुक केला. परंतु, त्यांना प्लॉट न देता केवळ पैसे गुंतवण्यास सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन आरोपीने 76 लाख 51 हजार 996 रुपयांची फसवणूक केली.