
नव लाख उंबरे येथे २२ लाखांचा तंबाकूजन्य पदार्थांचा साठा हस्तगत
पुणे लाईव्ह । ५ जानेवारी २०२३ । नव लाख उंबरे येथील एका गोठ्यातून 21.89 लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.
याप्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 328, 272, 273, 188 सह अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम 30 (2)(ए) अन्वे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हनुमान चौधरी, वय 28 वर्षे, रा. वडगाव मावळ या आरोपीला अटक करण्यात आले आहे. तर पंडित जाधव, रा. जाधववाडी, नव लाख उंबरे, वडगाव मावळ, जि. पुणे व राजूभाई सुपारीवाला, रा. अहमदाबाद या आरोपींचा शोध सुरू आहे.
ही घटना 4 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता च्या सुमारास पंडित जाधव यांच्या गोठ्यात नव लाख उंबरे, जाधव वाडी पुणे येथे घडली आहे.
आरोपी हनुमान जाधव याने आरोपी पंडित जाधव यांच्या गोठ्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ या असुरक्षित आरोग्यास घातक अपायकारक असा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा बेकायदेशीरपणे ठेवला होता. एकूण 21.89 लाख रुपये किमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी राजू भाई सुपारीवाला याच्याकडून विकत घेऊन तो जाधव यांच्या गोठ्यात ठेवला होता. हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे.