
फायनान्स कंपनीची २२ लाखांत फसवणूक ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I सगी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड न करता कंपनीची 22 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच फायनान्स कंपनीच्या मालकालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही देण्यात आली आहे. हा प्रकार 28 जुलै 2022 ते 19 डिसेंबर 2022 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला आहे.
याप्रकऱणी प्रशांत हिम्म्तराव देशमुख (वय 54, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून पोलिसांनी एक महिला आरोपी व बासु निर्मल अधिकारी (वय 39, रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा खासगी फायनान्सचा कायदेशीर व्यवसाय आहे. आरोपींनी संगणमताने फिर्यादी यांच्याकडून 18 सप्टेंबर 2020 रोजी 30 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातील काही कर्जाची आरोपींनी परतफेड केली. मात्र, 28 जुलै 2022 पासून उर्वरीत 22 लाख रुपये मुद्दल व प्रतीमहा 33 हजार रुपायांचे व्याज फिर्यादी यांना न देता त्यांची फसवणूक केली. तसेच, पैसे मागण्यासाठी गेले (Nigadi Fraud) असता फिर्यादी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
