PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

२०० कोटींच्या कर्जाचे आमिष ; महिलेस घातला ७९ लाखांचा गंडा

पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | सौरऊर्जा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यापोटी 79 लाख रुपये घेत महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 2 जानेवारी 2020 ते 24 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मारुंजी आणि पुणे परिसरात घडला.

विद्याधर काशिनाथ जोशी (रा. कर्वेनगर, पुणे), परेश शहा (रा. बोरिवली, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 200 कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगितले. पाच कोटी कर्जासाठी दोन लाख रुपये चार्ज याप्रमाणे 200 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी महिलेकडून 79 लाख रुपये आरोपींनी घेतले. पैसे घेऊन महिलेला कर्ज मंजूर करून न देता तिची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.