PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

पुणे लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I पीएमपीएमएल बस थांब्यावर थांबलेल्या महिलेच्या पर्समधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना बस कंट्रोलरच्या सर्कतेमुळे बेड्या पडल्या आहेत. जि घटना निगडी येथील पीएमपीएमएल बस स्टॉपवर मंगळवारी (दि.20) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली .

याप्रकऱणी शत्रुघ्न पांडुरंग नेवरे (वय 48 रा. सांगवी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी 22 वर्षीय तरुणी विनोद संजय बाजड (वय 35 रा.निगडी) यांना अटक केली आहे.

फिर्यादी नेवरे हे पीएमपीएमएलमध्ये वाहतूक कंट्रोलर पदावर काम करतात. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता निगडी येथील पीएमपी थांब्यावर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी दोघेजण एका प्रवासी महिलेच्या पर्सची चेन उघडून चोरी करत होते. हा प्रकार निदर्शनास आल्याने नेवरे यांनी चोरट्यांना हटकले. त्यानंतर चोरट्यांनी नेवरे यांच्याशी झटापटी करून धक्काबुक्की करत हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना अटक केली आहे. आरोपीवर चोरीचा प्रयत्न व सराकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.