
महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी ; एकास अटक
पुणे लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने महिलेला भेटायला बोलावून त्याचे फोटो काढून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने आरोपीस भेटण्यासाठी नकार दिला असता महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची त्याने धमकी दिली. याबाबत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सन 2020 ते 30 डिसेंबर 2022 या कालावधीत आकुर्डी रेल्वे स्टेशनयेथे घडली.
अतुल निरंजन यादव (वय 31, रा. जमेथा, जि. जोनपूर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेची आरोपीसोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली. अतुल याने फिर्यादीच्या फोटोचे स्क्रिनशॉट काढून तिला वारंवार भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादीस इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर मेसेज करून खासगी फोटो आणि शरीरसुखाची मागणी केली. अतुल याने फिर्यादीचा वारंवार पाठलाग करून तिला आकुर्डी रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले. फिर्यादी भेटण्यासाठी आली नाही तर तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत आरोपीने शिवीगाळ केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.