PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

देहूगाव येथे चोरटयांनी हार्डवेअरचे दुकान फोडले ; दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । देहुगाव येथील रामा ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.ही चोरी बुधवारी (दि.4) रात्री ते गुरुवारी (दि.5) पहाटे या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी अशोक मधुकर हाटवटे (वय 27 रा. देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे देहुगाव बायपास रोडवर रामा ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून लाकडी रॅकवर ठेवलेले 1 लाख 91 हजार 600 रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे सॅनेटरी वेअर, सीपी फिटींग साहित्य चोरून नेले आहे. यावरून देहुरोड पोलीस टाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.