
शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधम तरुणाला अटक
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I घराशेजारीराहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. किरण चंद्रकांत गायकवाड (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांची शेजारी आहेत. 16 नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांचा मिक्सर खराब झाल्याने व त्यांची मुलगी मसाला वाटण्यासाठी शेजाऱ्यांच्या घरी गेली होती. यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीजवळ जाऊन तिच्या सोबत अश्लील चाळे करत तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर 18 डिसेंबर रोजी आरोपीने पुन्हा त्यांच्या मुलीला घरी बोलवून तिच्यासोबत वाद घातला आणि शिवीगाळ करत बदनामी करण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.