
डीपी मधील ऑइल आणि कॉपरच्या कॉईल लंपास
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I इलेक्ट्रिक डीपी मधील ऑइल आणि कॉपरच्या कॉईल असा पावणे दोन लाखाचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि. 18) सकाळी अभंग शाळेजवळ, देहूगाव येथे उघडकीस आली.
ओजस किरणकुमार शाह (वय 32, रा. औंध, पुणे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देहूगावातील अभंग शाळेजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील 42 हजार रुपयांचे डीपी ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि एक लाख 33 हजार रुपये किमतीच्या कॉपर कॉईलचे सहा नग असा एकूण एक लाख 75 हजार रुपयांचा माल अज्ञातांनी चोरून नेला. हा प्रकार शनिवारी (दि. 17) मध्यरात्री दोन ते रविवारी (दि. 18) सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
