PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

गांजा विक्री करणाऱ्यास अटक

पुणे लाईव्ह । ३ जानेवारी २०२३ ।गांजा विक्रीसाठी आलेल्या एका व्यक्तीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) दुपारी ज्योतिबानगर, तळवडे येथे करण्यात आली.

जगदीश मगाजी चौधरी (वय 58, रा. संयोगनगर, तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा चौकात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून जगदीश चौधरी या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये 197 ग्रॅम वजनाचा 4 हजार 925 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी चौधरी याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.