PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

दोन आरोपीकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त

पुणे लाईव्ह ।३१ डिसेंबर २०२२ । पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीन यांनी दोन वेगवेगळ्या कारवाईमंध्ये दोन सराईत आरोपीकडून चार पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या (हद्दीत केली.

पहिल्या कारवाईत पोलिसांना चाकण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करत असताना अरविंद सिकंदर शेख (वय 29 रा. चाकण) हा एकता नगर येथील ग्लाडीयस इंग्लिश मिडीयम स्कुलकडे जाणाऱ्या रोडवर एक जण शस्त्रासह थांबल्याची खबर मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन पिस्टल व तीन जिवंत काडतुस अशा 1 लाख 33 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये देवेंद्र सुनिल मिंडे (वय 34, रा.म्हाळुंगे) याला पोलिसांनी म्हाळुंगे गावाच्या कमानीजवळ 28 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस अशा 51 हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.

पोलिसांनी केलेल्या तपासात शेख याच्यावर (Chakan) चाकण पोलीस ठाण्यात खून, मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणे असे तीन गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले, तर देवेंद्र मिंडे याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता विरोधी गटाकडून असणाऱ्या धोक्यामुळे त्यांनी ही शस्त्रे स्वतः जवळ बाळगल्याचे कबुल केले. याचा पुढील तपास गुन्हे शाखा तीन व चाकण पोलीस करत आहेत.

हि कारवाई गुन्हे शाखा तीनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहूल सुर्यवंशी, सुधीर दांगट, विठ्ठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे यांनी केली.