PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न, सावत्र बापाला अटक

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iसावत्र मुलीचा विनयभंग करून तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावत्र बापाला अटक करण्यात आली आहे.चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय सावत्र बापाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी तक्रार दिली.

आरोपी हा फिर्यादी मुलीचा सावत्र बाप आहे. सप्टेंबर 2021 पासून तो सातत्याने या मुलीला त्रास देत होताआरोपीने फिर्यादीला मिठी मारून आय लव यू म्हणत तिच्या सोबत जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर फिर्यादी मुलीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.