PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

महाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण

पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iमहाविद्यालयात घुसून तरुणांना मारहाण करण्यात आली आहे. यामुळे महाविद्यालय परिसरात दहशत पसरली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज परिसरात घडली.

पोलीस हवालदार सचिन बेबले यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहम संजय रास्ते (वय 20, रा. बावधन) आणि अन्य दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कार मधून आलेल्या तीन ते चार जणांनी मिळून हाताने मारहाण केली. लोखंडी कोयते घेऊन कॉलेजमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करून आरोपी पळून गेले. पोलिसांनी सोहम रास्ते याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.