
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I घराशेजारी राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीचा 28 वर्षीय तरुणाने वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव बुद्रुक परिसरात रविवारी हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपी प्रशांत पोपट रेवडे (वय 28) याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी आणि फिर्यादी एकमेकांचे शेजारी आहेत. फिर्यादी यांना दहा वर्षाची मुलगी आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही आरोपीने वारंवार तिला जबरदस्तीने जवळ उडून विनयभंग केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.
