PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार

पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iपुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत अवैध जुगार अड्डे (मटका) चालवणाऱ्या टोळीला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

राजेंद्र कोंडे, वय 50 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, राजेश नायर, वय 32 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, दिलीप शिंदे, वय 47 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, पापाभाई शेख, वय 59 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, संदीप शिंदे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, विशाल कदम, रा. शिवाजीनगर, ता. हवेली, जिल्हा पुणे, पंकज कोंडे, वय 32 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे, खंडू खांबे, वय 26 वर्षे, रा. खेड शिवापुर, ता. हवेली, जि. पुणे यांच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात अवैधरित्या मुंबई व कल्याण नावाचा मटका अड्डा चालविणे अशा प्रकारचे एकूण 7 गुन्हे दाखल होते.

या टोळीतील प्रमुख राजेंद्र कोंडे यांनी आपली गुन्हेगारी टोळी तयार करून सर्वसामान्य नागरिक, कामगार वर्ग, तसेच स्थानिक रहिवासी यांच्यामध्ये टोळीची दहशत निर्माण केली होती. त्यांच्याबरोबर वेळी कोणी दाखल करूनही त्यांच्या गुन्हेगारी कृत्यात कोणताही फरक पडला नाही. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तयार करून धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फतीने तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सादर केला होता. या प्रस्तावाची धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर उपविभाग सासवड यांनी सखोल चौकशी करून चौकशीचा अहवाल पोलीस अधीक्षक यांना सादर केला होता.