
ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । ट्रेलर व कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर सोमवारी (दि.2 जानेवारी) झाला होता. उपचारादरम्यान कार चालकाचा मृत्यू झाल्याने गुरुवारी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
या अपघातात इरटिगा कारचा (एमएच 01 बीयू 7111) चालक गजराज फत्ते सिंग (वय 41 रा. अंधेरी, मुंबई) याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी ट्रेलर चालक (एमएच 46 बी.एम 6591) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
चाकण-तळेगाव दाभाडे रोडवर ट्रेलर चालकाने भरधाव वेगात राँग साईडने जात असताना समोरून येणाऱ्या इर्टिगा कारला जोरदार धडक दिली. यामध्ये गजराज गंभीर जखमी झाले व त्यांच्या कारचे पाच लाखांचे नुकसान झाले, यावेळी ट्रेलर चालकाने तेथे थांबून जखमीला मदत न करता पळ काढला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
या धर्म परिवर्तन करण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका महिलेने हातात ट्रे घेतला असून त्यामध्ये 5-6 छोटे ग्लास आहेत. या ग्लासमध्ये लाल रंगाचे द्रव्य आहे. ती महिला ते द्रव्य घरातील महिला व व्यक्तींना ते येशूचे रक्त असल्याचे सांगून त्यांना प्यायला सांगत असल्याचे दिसून येत आहे.