
पुण्यात १५ वर्षीय मुलीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार
पुणे लाईव्ह I २८ डिसेंबर २०२२ Iपुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीसोबत सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले आहे. आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन सहा आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. चतु शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे किरण जावळे शुभम सुनील जाधव आणि अनिल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जुलै ते डिसेंबर 2022 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला.
याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आरोपी अनिल जाधव यांनी चाकूचा धाक दाखवून पीडित मुलीचे अपहरण केले. पुणे शहरातील एका लॉजवर तिला घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने तिचे लग्न अवस्थेतील फोटो काढले.आणि हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी वेळोवेळी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सर्व आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.